ANNOUNCEMENT

शताब्दी वर्षारंभ समारोह प्रारंभ,   दिनांक : 16 जनवरी 2025, गुरुवार,   समय : दोपहर 3:30 बजे,   स्थान : महारानी लक्ष्मी बाई विद्यालय प्रांगण, जबलपुर |

ABOUT US

Maharashtra Shikshan Mandal

Before gaining independence, Jabalpur was part of the old Central Province & Berar, with Nagpur as its capital and Jabalpur as its sub-capital. After the 1857 uprising, the British replaced Raja Saheb Kher of Sagar and settled him in Jabalpur. As a result, a significant Marathi-speaking population emerged in Jabalpur, influenced by the freedom movement ignited by Lokmanya Tilak from Pune.
Inspired by the ideals of freedom, the Marathi-speaking intellectuals in Jabalpur began to think about providing education in their mother tongue. With this objective, the 'Maharashtra Shikshan Mandal, Jabalpur' was established in 1926. The idea of education in Marathi took shape in the form of 'Maharashtra High School, Jabalpur.' Notably, these pioneers, ahead of their time, introduced the progressive concept of co-education (boys and girls studying together), which was unique in Central India at that time. Today, the school is entering its centenary year, a testament to the success of our visionary founders, whose dedication to education is a source of pride for us all. In its early years, the school operated out of rented buildings. Around 1928-30, the current building of Maharashtra High School was constructed, and the first matriculation batch graduated in 1934. Over time, the school steadily progressed, with students consistently securing top positions in the board examinations, bringing glory to the school and setting a tradition of excellence. Initially, the Education Board offered education only in Marathi. However, in response to growing demand, a separate Hindi-medium school, 'Mahakoshal Higher Secondary School,' was established in 1936. This school also set numerous milestones. In line with this progress, 'Maharashtra English High School' was founded in 1981.
Three decades after the reorganization of states, the Marathi language was no longer used for question papers, and the Board was compelled to discontinue Marathi-medium education. The focus shifted to Hindi-medium education, but the tradition of excellence in board results continued. Today, Maharashtra Shikshan Mandal operates three high schools: Maharashtra Hindi High School, Maharashtra English Medium School, Mahakoshal Higher Secondary School, along with the proud establishment of Maharashtra College. With the centenary year, the Board has also started 'Maharashtra Law College' after receiving the necessary approval. The students from the various schools under Maharashtra Shikshan Mandal are now spread across the world, writing new chapters of success. The Board takes immense pride in all its alumni. This success is undoubtedly a reflection of the Board's selfless, transparent service in running these institutions, which is essential for the future of any educational institution. It also sets an exemplary model for society

महाराष्ट्र शिक्षण मंडल

स्वतंत्रता प्राप्ति से पूर्व जबलपुर यह पुराने मध्य प्रांत एवं बरार (Central Province & Berhar) का एक हिस्सा था, जिसकी राजधानी नागपुर एवं उपराजधानी जबलपुर थी। अंग्रेजों ने 1857 की क्रांती के पश्चात, सागर के राजा साहब खेर को स्थानापन्न कर, जबलपुर में बसाया। परिणामत: जबलपुर में मराठी भाषिकों की अच्छी खासी संख्या थी, जो पुणे से लोकमान्य तिलक द्वारा जगाई स्वतंत्रता की अलख से प्रभावित तथा प्रेरित भी थी।
स्वतंत्रता की इसी प्रेरणा से प्रेरित होकर, राष्ट्रीय विचारों से ओतप्रोत, मातृभाषा में शिक्षा का विचार यहां के मराठी भाषिक मनीषियों के मन में उठा। इसी उद्देश्य के साथ 'महाराष्ट्र शिक्षण मंडल, जबलपुर' की 1926 में स्थापना हुई। मातृभाषा मराठी में शिक्षा का विचार, 'महाराष्ट्र हायस्कूल' जबलपुर के रूप में साकार हुआ। यहां यह बात उल्लेखनीय हैं, कि उस समय में भी इन पुरोधाओं ने, समय से आगे की सुधारवादी, प्रगतिवादी, विकासशील सोच रखते हुए सह - शिक्षा ( छात्र छात्राएं एक साथ पढ़ना) जैसा प्रयोग लागू किया, जो पूरे मध्य भारत में अनूठा था। आज शाला अपने शताब्दी वर्ष में प्रविष्ट हो रही हैं। यह, शिक्षाके प्रति समर्पित, दूरदृष्टी रखने वाले हमारे संस्थापकों की सफलता हैं, जिसका हम सब को गर्व हैं। अपने शैशव काल में शाला विभिन्न जगहों पर किराए के भवनों में संचालित होती रही। लगभग 1928 - 30 के दरम्यान, महाराष्ट्र हायस्कूल का वर्तमान स्थान पर भवन तैयार हुआ, जिसमें से प्रथम मैट्रिक बैच, 1934 में पास आउट हुई। शनै: शनै: शाला उत्तरोत्तर प्रगति के सोपानों पर चढ़ती गई। प्रतिवर्ष शाला के छात्र, बोर्ड परीक्षाओं में संभाग तथा प्रदेश की प्रवीण्य सूची में लगातार स्थान प्राप्त कर, विद्यालय एवं उसकी शिक्षा को गौरवान्वित करते रहे। जनमानस के समक्ष प्रतिभा का उदाहरण प्रस्तुत करते रहे और यह मानों परंपरा सी बन चुकी थी।
आरम्भ में शिक्षण मंडल मात्र मराठी भाषा माध्यम में शिक्षा कार्य करता था। किंतू, 1936 के दौरान, लोगों की मांग एवं आवश्यकता के अनुसार, हिंदी माध्यम में भी, पृथक रूप से 'महाकौशल उ. मा. विद्यालय' प्रारंभ किया। इस विद्यालय ने भी अनेक किर्तीमान स्थापित किए। प्रगती के इसी आलेख मे, 1981 में 'महाराष्ट्र इंग्लिश हायस्कूल' की भी स्थापना साकार हुई। राज्यों के पुनर्गठन के तीन दशकों बाद मराठी में प्रश्न पत्र आना बंद हो जाने से मंडल, मराठी भाषा माध्यम पूर्णतः बंद करने पर विवश हुआ। अब हिंदी माध्यम का अध्याय आरम्भ हुआ। पर विद्यालय के स्तर पर, प्रवीण्य सूची में नामों की परंपरा कायम रही। आज महाराष्ट्र शिक्षण मंडल, तीन उ. मा. विद्यालय - . महाराष्ट्र हिंदी हायस्कूल, . महाराष्ट्र इंग्लिश मीडियम स्कूल, . महाकौशल उ. मा. विद्यालय के साथ ही, . महाराष्ट्र महाविद्यालय का भी गौरव के साथ संचालन कर रहा है। शताब्दी वर्ष में प्रवेश के साथ ही, विधि महाविद्यालय की स्वीकृति प्राप्त कर, 'महाराष्ट्र विधि महाविद्यालय' भी आरम्भ कर चुका है। आज महाराष्ट्र शिक्षण मंडल के विभिन्न विद्यालयों से निकले छात्र, पूरे विश्व मे फैले हुए हैं, तथा सफलता के नये अध्याय लिख रहे हैं। महाराष्ट्र शिक्षण मंडल को अपने सभी पूर्व छात्र - छात्राओं पर गर्व हैं। यह सफलता निश्चित ही मंडल द्वारा निष्काम, निस्वार्थ, पारदर्शी सेवा भाव से संस्थाओं के संचालन का द्योतक है, जो विद्यार्थीयों के भविष्य के लिए, किसी भी शिक्षा संस्था की प्रथम अनिवार्य आवश्यकता हैं। साथ ही, समाज के समक्ष एक आदर्श अनुकरणीय उदाहरण भी हैं।

महाराष्ट्र शिक्षण मंडळ

स्वातंत्र्य पूर्व काळात जबलपूर, हे जुना मध्य प्रांत आणि बरार चे एक प्रमुख शहर होते. ह्या प्रांताची राजधानी नागपूर आणि उप राजधानी जबलपूर होती. सन १८५७ च्या सशस्त्र क्रांती नंतर इंग्रजांनी सागर चे राजासाहेब खेर यांना जबलपुरात पदस्थ केले. परिणामी पुण्यात लोकमान्य टिळकांनी पेटवलेल्या स्वराज्य चळवळीने प्रेरित होऊन बराच मोठा मराठी समाज जागृत झाला. त्या चळवळीतूनच प्रेरणा घेउन जबलपुरातील काही मराठीभाषी प्रबुद्ध समाज सेवकांनी मातृभाषेत शिक्षण देण्याचे ध्येय समोर ठेवले. त्या वेळच्या प्रदेश शासनाने देखील त्यांच्या ह्या ध्येयात मदत केली, कारण त्यावेळी राज्य शासनात द्वितीय शासकीय भाषा मराठीच होती. सन १९२६ मध्ये “महाराष्ट्र शिक्षण मंडळ, जबलपूर” ह्या संस्थेची स्थापना झाली आणि मातृभाषा मराठीतून शिक्षण देण्याची कल्पना “महाराष्ट्र हायस्कूल” च्या रूपाने साकार झाली. ह्या आद्य प्रवर्तकांनी त्या काळाच्याही पुढे एक पुरोगामी पाउल घेउन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ह्यांचे सहशिक्षण सुरु करण्याचा विचार मांडला, जो संपूर्ण मध्य भारतात एकमेव प्रयोग होता. आज शिक्षण मंडळ आपल्या शताब्दी वर्षात प्रवेश करीत आहे. शिक्षणाला समर्पित असलेल्या आपल्या दूरदर्शी संस्थापकांच्या ह्या दैदिप्यमान सुयशाचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.
बाल्यवस्थेत शाळा विविध ठिकाणी भाड्याच्या इमारतीत चालत राहिली. १९२८-३० च्या सुमारास महाराष्ट्र हायस्कूल ची इमारत सध्याच्या ठिकाणी बांधण्यात आली आणि १९३४ मध्ये उच्चतर माध्यमिक परीक्षा देउन पहिली तुकडी उत्तीर्ण झाली. येथून शाळेची प्रगतीपथावर निरंतर वाटचाल होत राहिली. तेंव्हा पासूनच शाळेतील विद्यार्थी राज्य बोर्डाच्या परीक्षेत उच्च गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळा आणि जबलपूरचा गौरव वाढवीत आहेत आणि अश्या प्रकारे ते आपल्या प्रगल्भ बुद्धीला सातत्याने प्रदर्शित करून एक गौरवपूर्ण परंपरा स्थापित करीत आहेत.
सुरुवातीस शिक्षण मंडळ फक्त मराठी माध्यमातूनच शिक्षण देत असे. त्यावेळी सर्व विषयांचे अभ्यासक्रम आणि पुस्तके देखील महाराष्ट्र बोर्ड प्रमाणेच असत. कालांतराने शासनाकडून सहयोग कमी होत गेला आणि १९८५ मध्ये राज्य शासनाने मराठीऐवजी उर्दू भाषेला द्वितीय भाषेचा दर्जा दिला. १९८७-८९ च्या दरम्यान महाराष्ट्र बोर्डाने तेथील अभ्यासक्रम बदलला, पण तो बदल आपल्या राज्यात लागू केला गेला नाही. त्यामुळे कोणत्याही विषयांची मराठी पुस्तके मिळणे जवळजवळ बंद झाले आणि परिणामी, मराठी माध्यमासाठी विद्यार्थी देखील अतिशय कमी होत गेले. विद्यार्थ्यांची संख्या अतिशय कमी झाल्यामुळे शासनाकडून आर्थिक मदत बंद झाली, ज्यामुळे मराठी माध्यम चालवणे अशक्य झाले. त्यानंतर मराठी ही एक वैकल्पिक भाषा म्हणून घेणारे विद्यार्थी देखील फार कमी होत गेले, तरी शाळेने फक्त एकच विद्यार्थी असेपर्यन्त ही भाषा शिकवणे सोडले नव्हते, ही गोष्ट मराठी भाषिकांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.
१९३६ च्या दरम्यान नागरिकांच्या वाढत्या मागणीस मान देउन मंडळाने महाकोशल उच्चतर माध्यमिक विद्यालय, ही हिंदी भाषेच्या माध्यमातून शिक्षण देणारी स्वतंत्र शाळा स्थापित केली होती. ह्या शाळेच्या विद्यार्थ्यांनीही बोर्डाच्या परीक्षांमध्ये अनेक विक्रम स्थापित केले. प्रगतीची अशीच पावले टाकत मंडळाने १९८१ मध्ये महाराष्ट्र इंग्लिश हायस्कूल ची स्थापना केली. राज्याच्या पुनर्स्थापनेच्या तीन दशकांनंतर राज्य शिक्षा बोर्डाने मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका बंद केल्यामुळे मंडळाला मराठी माध्यमातून शिक्षण बंद करणे भाग पडले. त्यामुळे मंडळाने हिंदी आणि इंग्लिश माध्मातूनच शिक्षण देणे सुरु ठेवले, परंतु गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांच्या नावांची परंपरा मात्र कायम टिकून आहे. आज शिक्षण मंडळ, महाराष्ट्र हिंदी हायस्कूल, महाकोशल हायस्कूल, महाराष्ट्र इंग्लिश हायस्कूल अश्या तीन उच्चतर माध्यमिक शाळांबरोबरच महाराष्ट्र कॉमर्स व आर्ट्स महाविद्यालय देखील चालवत आहे. शताब्दी वर्षाच्या सुरुवातीलाच विधी शिक्षणालाही शासनाकडून परवानगी व मान्यता मिळाल्याने महाराष्ट्र विधी महाविद्यालय देखील सुरु झाले आहे. आज शिक्षण मंडळाच्या ह्या सर्व संस्थांमधून निघालेले हजारो विद्यार्थी जगभर पसरले असून यशाचे नवीन कीर्तिमान रचत आहेत. शिक्षण मंडळास आपल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा अत्यंत अभिमान आहे. हे यश अर्थातच मंडळाच्या निस्वार्थ, पारदर्शी आणि सेवा भावनेने संस्था चालवण्याचे द्योतक आहे. हीच निरंतर उन्नतीसाठी प्रत्येक शिक्षण संस्थेची पहिली आवश्यकता असते आणि हीच समाजापुढे आदर्श व्यवस्थेचे मापदंड कायम करते.

नमस्कार,

नवीन शैक्षणिक धोरणा (New Education Policy - NEP) च्या अंतर्गत काही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यातील एक आहे - राष्ट्रभाषे व्यतिरिक्त एखादी भारतीय भाषा शिकायला प्राधान्य. त्यानुसार काही ग्रेड पॉईंट्स मिळायचे प्रावधान.

याच अनुषंगाने, गेली सात - आठ महिने आपण प्रयत्न करत होतो कि आपल्या आणि इतर शाळांमध्ये मराठी कशी शिकवता येईल. या प्रयत्नांना आता आकार आला आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडल आणि सरस्वती शिक्षा परिषद मिळून हा प्रकल्प राबवणार आहोत. जबलपुरातील प्रसिध्द सर्जन, डॉ. अखिलेश गुमाश्ता यात शिक्षा परिषदेच्या वतीनं प्रयत्न करत आहेत. प्रारंभी आपल्या तीन शाळा आणि सरस्वती शिक्षा परिषदेच्या अंतर्गत चालणाऱ्या ८ शाळांमधून मराठी हा विषय शिकविण्याची योजना आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून ही योजना प्रत्यक्षात उतरणार आहे. यात आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.

आपण खालील प्रकारे या प्रकल्पात सामिल होऊ शकता -

  • पाचवी, सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीचे कोणते पुस्तक योग्य राहील? पूर्ण पुस्तक शिकवायचे, की त्यातील काही भाग? या विषयावर कृपया आपला सल्ला हवा आहे.
  • प्रत्यक्ष विद्यार्थांना मराठी शिकविण्यासाठी - हे काम प्रारंभी तरी स्वयंसेवी स्वरुपाचे असेल. यात जबलपुरात राहणारे मराठी भाषिकच सामिल होऊन शकतील. आपल्या शाळांमधून शिकविण्याची व्यवस्था झालेली आहे. मात्र सरस्वती शिशु मंदिराच्या शाळांमधून शिकविण्यासाठी स्वयंसेवी शिक्षक / शिक्षिका लागतील.
  • विद्यार्थ्यांचे मूल्यांकन (evaluation) करण्यासाठी आपल्यापैकी कोणीही मदत करु शकतात. या संदर्भात कृपया आपली willingness, स्वीकृती, माहिती, suggestions खालील e-mail वर पाठवावे -
  • msmjbp@gmail.com आणि gumashta.akhilesh@gmail.com

प्रशांत पोळ

sharee-nago-ook
संस्थापक

स्व.श्री न.गो. ओक

shree-neeg-lele
संस्थापक

स्व. श्री नी. ग.लेले

krishna-hari
प्रथम अध्यक्ष

कै. रा. सा. कृष्णा हरी दाते

महाराष्ट्र शिक्षण मंडल जबलपुर, वर्तमान पदाधिकारियों की सूची

अध्यक्ष

डॉ. जयंत कुमार तनखीवाले

उपाध्यक्ष

श्री उदय परांजपे

सचिव

श्री प्रमोद दिवाकर पाठक

सहसचिव

श्रीमती निरूपमा हर्षे

कोषाध्यक्ष

श्री अनिल मोघे

प्रबंधक

एडवोकेट श्री उदय देशमुख

महाराष्ट्र शिक्षण मंडल, शताब्दी समारोह समिति

संरक्षक

न्यायमूर्ति श्री डी. एम. धर्माधिकारी

संरक्षक

न्यायमूर्ति श्री प्रकाश नावलेकर

अध्यक्ष

डॉ. जितेन्द्र जामदार

prashant-pol
कार्यकारी अध्यक्ष

श्री प्रशांत पोल

उपाध्यक्ष

श्री अनिल राजुरकर

सचिव

श्री अविनाश हलबे

सहसचिव

श्री अजय भालेराव

कोषाध्यक्ष

श्री उदय परांजपे

sharang-sir
सदस्य

सारंग भिडे

deepak sir
सदस्य

दीपक उबाळे

sunil-sir
सदस्य

डॉ सुनील देशपांडे